सतीश चव्हाण माझ्या विरोधात उभे राहण्याची चूक करू नका, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व भ्रष्टाचार चव्हाट्यावर येईल- खा. खैरे

Foto

औरंगाबादसतीश चव्हाण यांना माहीत नसेल तर सांगतो की खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच माझी स्तुती करून मला प्रोत्साहन दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे म्हणून चंद्रकांत खैरे हे कर्तृत्वाने निवडून येतात.तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनीच माझे कौतुक केले आहे मात्र आमदार चव्हाण यांनी टीका टिप्पणी करण्याचे उद्योग सुरू केले आहे. ते त्यांनी करू नये. आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण यांनी माझ्यासमोर उभेच राहावे आणि मग मी त्यांच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि देवगिरी महाविद्यालयात दिलेल्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या नौकऱ्यातील भ्रष्टाचार बाहेर काढतो असे खुले आव्हान खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांजवार्ता ऑनलाईनशी बोलतांना केले.


 

राष्ट्रवादीच्या परिवर्तन निर्धार यात्रेनिमित्ताने आमदार चव्हाण यांनी जिल्ह्यातील १६ लाख मतदार खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराज असून त्यांचा पराभव निश्चित असल्याने औरंगाबाद लोकसभा लढविण्यास इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे असे विधान आज माध्यमांशी बोलतांना केले. यावर ऊत्तर देत शिवसेना स्टाईल ने उत्तर देत चव्हाण यांच्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी तोफ डागली.

 

खा. खैरे म्हणाले कीआमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ढवळाढवळ करू नयेहा माझा त्यांना मौलिक सल्ला आहे. त्यांना उमेदवारी मिळतेच की नाही हेच स्पष्ट नाहीमात्र तरीही त्यांनी माझ्यासमोर उभे राहून दाखवावे आणि मग मी त्यांना पुराव्यानिशी सांगेल की मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापककर्मचारी भरती प्रकरणी किती भ्रष्टाचार झाला आहे ते. आगामी निवडणुकीत शिक्षण संस्थेतील सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे खैरे म्हणाले. आमदार सतीश चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले कीशहरातील कचरापाणीतसेच रस्त्याच्या दुरावस्थेला महापालिकेतील सत्ताधारी जबाबदार आहे. खासदार खैरे यांना टोला लगावत त्यांनी पिठाची गिरणी तरी आणली काअसा सवाल पुन्हा एकदा उपस्तीत केला यावर खैरें यांनीही जशास तसे उत्तर आमदार चव्हाणांना दिले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker